Miraculous benefits of eating nutmeg

जायफळाचे (Nutmeg) शरीरास खूप चमत्कारी फायदे होतात. जायफळमध्ये अनेक औषधी गुण  असून पेन रिलिव्ह, पोटाचे दुखणे, शरीरातील घाण काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे व दातांची निघा राखणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे, त्वचा चमकावणे असे अनेक कार्य करते. अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. फायबर, मॅग्नेशिअम, लोह, व्हिटॅमिन बी ३ व बी ६, कॉपर असते. जे शरीराला लाभदायक आहे.

जायफळाचे फायदे

पचनक्रिया
जायफळ वाटून त्याची पावडर तयार करताना यामधून काही तत्त्व बाहेर पडतात. यामुळे वेदना दूर होण्यास मदत होते. पोटाच्या त्रासात जायफळ नेहमीच आहारात ठेवावे. गॅस, अपचन, पोटात दुखणे, बुद्धकोष्टता अशा अनेक समस्या जायफळामुळे ठिक होतात.

स्मरणशक्ती
जायफळ स्मरण शक्ती वाढवते. जायफळ खाल्याने मेंदू दुप्पट पटीने काम करतो आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यास प्रेरणा देतो.

बॉडी डिटॉक्स
शरीरातील आणि रक्तातील सर्व टॉक्सिन्स काढण्याचे काम जायफळ करते. किडनी स्टोन आणि लिव्हर सारखे आजार बरे करण्यास याची महत्वाची कामगिरी असते.

नक्की वाचा

1) आरोग्यासाठी झोपण्याची स्थितीही ठरते महत्वाची

2) Weight Loss : सकाळी की संध्याकाळी ? कोणत्या वेळी व्यायाम केल्यानं वेगानं घटतं वजन

तोंड आणि दात
जायफळ मध्ये अँटी बॅक्टेरियाल गुणधर्म असतात. जे तोंडातील बॅक्टेरिया मारतात. जायफळ पावडरने दातांना मसाज केल्यास दात दुःखी, दातांतील फट, तोंडाचा दुर्गंध अशा समस्या दूर करते. अनेक टूथपेस्टमध्ये जायफळ असते.

निद्रानाश
जायफळ खूप पूर्वीचा काळापासून निद्रानाशवर उपाय म्हणून वापरले जाते. जायफळ पावडर दुधामध्ये टाकून पिल्यास रिलॅक्स होण्याचा अनुभव होतो आणि झोप लागते.

त्वचा
जयफळामधील एक गुणधर्म नेहमी विसरला जातो तो म्हणजे जायफळ त्वचेला गुणकारी आहे. सर्व प्रकारचे त्वचा रोग बरे होतात.

वेदनाशामक
जायफळ मध्ये एक पेन रिलिव्हर गूण आहे. जयफळामध्ये मेंथॉल नामक एक घटक असतो जो पेन रिलिव्हर चे काम करतो. या कारणास्थाव रोजचा भाजीत जायफळाचा प्रयोग करावा.