If you want to lose weight, make sure to follow this 'coffee' diet

कॉफी डाएटमध्ये तुम्हाला हलक्या भाजलेल्या बियांची कॉफी प्यावी लागते. ही तुम्ही घरीच बारीक करून किंवा फिल्टर्ड पाण्याचा वापर करून तयार करू शकता. तीन कप कॉफीचं सेवन एका दिवसात करावं, पण त्यात साखर आणि क्रीमचा वापर करू नये. कॉफी डाएटमुळे तुमची भूक कमी होते सोबतच कॅलरीचं प्रमाण देखील कमी होण्यास मदत मिळते.

तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर जेवण करण्यापूर्वी एक कप कॉफी घेऊ शकतात. जेणेकरून तुमची भूक कमी होईल आणि जास्त खाणार नाही. सोबतच आहारही हेल्दी घ्यावा. यात हाय फायबरयुक्त पदार्थ, फळं आणि भाज्यांचा समावेश करावा.  लो कॅलरी किंवा चरबी असलेले हेल्दी स्नॅक्स, कडधान्य,  फायबर असलेली फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ तसेच साठवलेले अन्न  खाऊ नये. टोफू, ब्राउन राइस, ग्रिल्ड चिकन, सलाद यांचा आहारात समावेश जरूर करावा.