Such an increase in immunity

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती (Immunity) अबाधित राखणे खुप महत्वाचे ठरत आहे. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असूल तर कोरोनाला सुद्धा तुम्ही सहज तोंड देऊ शकता, हे शास्त्रज्ञांना कळून चुकले आहे. अनेकजण आपआपल्या परीने रोज काही ना काही प्रयत्न करत असतात. मात्र, आयुर्वेदिक पद्धतीचे पालन करून काही खास घरगुती उपाय केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. यामुळे तुम्ही कोरोना आणि इतर आजारांनाही दूर ठेवू शकता. जाणून घेवूयात आयुष मंत्रालयाने सांगितलेले रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय…

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

हे उपाय करा

1 योगा किंवा व्यायामासाठी 10 ते 20 मिनिट वेळ काढा. यामुळे आजारांपासून तुम्ही दूर राहात.

2 दिवसभरात एकदा तरी गरम पाणी प्या. यामुळे जठराग्नी व्यवस्थित राहतो. घश्यात व्हायरस आपली संख्या वाढवू शकत नाही.

3 हळदीच्या दुधाचं सेवन करा. 150 ग्राम दुधात अर्धा चमचा हळद मिक्स करा.

4 लवंगाची पावडर आणि मध, साखर मिसळून दिवसातून दोन ते तीनवेळा सेवन करा. यामुळे खोकला, घश्यातील खवखव थांबेल.

5 नारळाचे तेल, तिळाचं तेल किंवा तुप नाकाच्या छिद्रांमध्ये लावल्यास लाभदायक ठरू शकते.

6 तुळस, काळी मिरी, दालचीनी, सुंठ आणि मनुके यांचा काढा तयार करून प्या.

7 रोज सकाळी एक चमचा 19 ग्रॅम च्यवनप्राशचे सेवन करा. डायबिटिस असलेले रूग्ण शुगर फ्री च्यवनप्राशचं सेवन करू शकतात.

8 जेवणात रोज हळद, जीरं धणे, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा.