In the egg yolk

काही लोक फारच चिकित्सक असतात. अंडे (Eggs) खातानाही त्याचा पिवळा बलक काढून टाकून देतात. पिवळ्या बलकामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने असे केले जाते. परंतु, याबाबत कुणीही आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा निर्णय घेत नाहीत. यामुळे अंड्याचा पिवळा बलक खायचा की पांढरा भाग हा गोंधळ नेहमीच दिसून येतो. परंतु, हे दोन्ही घटक खुपच पौष्टिक आणि आरोग्यासाठी आवश्यक असतात. यात कोणते पौष्टिक घटक असतात, याची माहिती आपण घेणार आहोत.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

पिवळा बलक

१. अंड्याच्या पिवळ्या बलकात पांढऱ्या भागापेक्षा जास्त व्हिटॅमिन आणि
२. मिनरल्सचा साठा चांगल्या प्रमाणात असतो.
३. यात कॅल्शिअमचे प्रमाण तब्बल ९० टक्के असते.
४. आयर्न प्रमाण ९३ टक्के असते.
५. कोलेस्टोरॉलही तुलनेने जास्त प्रमाणात असतात.

पांढरा भाग

१. यात मॅग्नेशिअम आणि प्रोटिनचे प्रमाण भरपूर असते.
२. ज्यांना हृदयाचा त्रास आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी अंड्याचा पांढरा भाग अधिक हेल्दी आहे.