Do you know the right time to drink green tea

अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात एखादे गरम पेय पिऊन करतात. यातही सकाळ-सकाळ गरमागरम चहा (
tea) पिणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसेच बदलत्या जीवनशैलीनुसार ग्रीन टी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामागे बहुतांश जणांची वेगवेगळी कारणे आहेत. उदाहरण सांगायचे झाले तर वजन कमी करण्यासाठी काही जणांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आपल्या रुटीनमध्ये ग्रीन टीचा समावेश केला असावा. मात्र, तुम्हाला ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत माहिती आहे का ? नसेल तर आम्ही आज तुम्हाला त्याबाबत माहिती देणार आहोत.

ग्रीन-टी चे प्रकार

बाजारात ग्रीन टीचे प्रकार वेगवेगळ्या पॅकिंग आणि स्वरुपात मिळतात. आपण आपल्या सोयीनुसार आणि निवडीनुसार ग्रीन टी घेऊ शकतो. मात्र, खूप कमी ग्राहकांना याबद्दल माहिती असते की निरनिराळ्या पॅकिंगसह ग्रीन टी चे प्रकार सुद्धा एकापेक्षा अधिक आहेत. यामध्ये स्वीटनर ग्रीन टी, टी बॅग, ग्रीन लीफ, ग्रीन टी पावडर आणि ग्रीन टी सप्लिमेंट्स अशा स्वरूपात ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाते. जगभरातील लोक ग्रीन टी चे सेवन करणे पसंद करतात.

ग्रीन-टीच्या सेवनाची योग्य वेळ

>> दिवसाची सुरुवात ग्रीन टी पीऊन केल्यास आरोग्यास भरपूर प्रमाणात लाभ भेटतो, या भ्रमात तुम्ही असाल. तर तुम्ही पूर्णतः चुकीचा विचार करत आहेत. आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तसेच सकाळच्या नाश्त्यात ग्रीन टीचा समावेश करु नये.

>> तसेच सकाळच्या नाश्त्यानंतर एका तासाने अथवा दुपारचे जेवण केल्यावर कमीत कमीत तासाने ग्रीन टीचे सेवन करावे. ग्रीन टी मधील पोषण तत्व तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे काम करते. सोबतच पाचन प्रक्रिया सुरळीत सुरु राहावी, म्हणूनही मदत होते.
ग्रीन टीत असते कॅफिन

इतर चहाप्रमाणे ग्रीन टी मध्ये असलेले कॅफिन तुमच्या शरीरास सक्रिय ठेवण्यास मदत करते. व्यायाम करण्यापूर्वी किमान अर्धा तासापूर्वी तुम्ही ग्रीन टी चे सेवन करु शकता. ज्यामुळे तुमच्या आरोग्यास अधिक लाभ भेटेल. पण ग्रीन टीचे अतिरिक्त सेवन करणं टाळा. कारण प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच त्याचे नुकसान देखील असते.

वजन कमी करण्यातही लाभदायक

ग्रीन टी मध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट शरीराची चयापचयाची क्षमता वाढवून वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ग्रीन टी मधील घटक शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यास पोषक असतात. योग्य प्रमाणात या पेयांचे सेवन केल्यास शरीरात सकारात्मक बदल घडून येतो.