‘Okra’ is very healthy and beneficial, know many benefits

भेंडी (Okra) आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टीक असते. यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियम असतात. भेंडीच्या सेवनाचा आपल्या केस, त्वचा, हृदय अशा अनेक अवयवांना खूप फायदा होतो. अनेकांना याबद्दल माहिती नाही. आज आपण भेंडीचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेणार आहोत.

1) तजेलदार त्वचा – भेंडीत व्हिटॅमिन ए, सी प्लोएट आणि कॅल्शियम असतं. भेंडीच्या सेवनानं त्वचा तजेलदार आणि निरोगी राहते. यासाठी ऑर्गेनिक ओरका पावडर यांची पेस्ट तयार करा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्याला लावा. यानंतर गरम पाण्यानं चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून 2 वेळा हा फेसपॅक वापरा.

2) केसांची निगा – भेंडीच्या सेवनानं शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. यातून तुमच्या केसांची निगा राखण्यासाठीही खूप फायदा होतो.

3) मधुमेह – ज्यांना मधुमेह आहे अशांना फायबरयुक्त पदार्थांची शिफारस केली जाते. भेंडीत पुरेशा प्रमाणात फायबर असतं. भेंडीत मायरीसेटीन देखील आहे. यामुळं रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

4) कोंडा – भेंडीमुळं तुमच्या केसांच्या कोंड्याचा त्रासही दूर होतो. केसांचा इचीनेस आणि त्यांच्या ड्रायनेसची समस्याही दूर होते.

5) पचनशक्ती – भेंडीच्या सेवनाने अनेक समस्या जसे की, मळमळ, पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि जास्त गॅस अशा समस्या टाळल्या जाऊ शकतात. यामुळं तुमची पचनशक्ती वाढून ती चांगली राहण्यास मदत होते.

6) दृष्टी – भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन आणि अँटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळं तुमची दष्टी चांगली राहते. यामुळं मोतीबिंदूपासूनही तुमचा बचाव होतो.

7) हृदय – भेंडीच्या सेवनानं हृदय निरोगी आणि स्वस्थ राहतं. भेंडी पॅक्टीन कोलेसट्रॉलला देखील कमी करण्यास मदत करते. .यातील विरघळणारे फायबर रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात. यामुळं हृदयरोगाचा धोका कमी होतो.

8) चेहऱ्यावरील पिंपल्स किंवा पुरळ – भेंडीत असणारं लिसलिसा जेल अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल, एनालजेस्टीक, अँटीइंफ्लेमेटरी आणि रि हायड्रेटींग असतं. भेंडीच्या सेवनामुळं चेहऱ्यावरील पिंपल्स आणि पुरळ कमी होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.