
अलिकडे पुरूषांमध्ये तारूण्यातच टक्कल (Bald) पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अनुवंशिकता तसेच हार्मोन्सची पातळी अनियंत्रित झाल्याने असे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय असून ते केल्यास केस गळती थांबते, केस मजबूत होतात आणि टक्कल पडत नाही.
नक्की वाचा
1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या
हे उपाय करा
१) ग्रीन टी बॅग्ज पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात थोडा लेमन ज्यूस मिसळून केसांना लावा.
२) बीट ज्यूसमध्ये मध आणि दही टाका. हे मिश्रण केसांना लावा.
३) तांदळाचे पाणी गार करा. नंतर ते डोक्याला लावा. अकाली टक्कल पडणार नाही.
४) अंडे ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. नंतर हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. केस मजबूत होतात.
५) आवळ्याचे तुकडे करून खोबरेल तेलात गरम करा. तेल थंड करून केसांना लावा.
६) दह्यामध्ये लेमन ज्यूस मिसळून केसांना लावल्याने केस गळती थांबते.
७) ऑलिव्ह आइलमध्ये मध, दालचिनी पावडर मिसळून हे तेल डोक्यांना लावा.
0 Comments