Face Yoga

जसे शरीराच्या अवयवांचे योग (Yoga) असतात तसेच चेहर्‍याचे योगसुद्धा असतात. चेहर्‍याच्या विशिष्ट मांसपेशींच्या मजबूतीसाठी चेहर्‍याचा योग केला जातो. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्यांपासून मुक्ती मिळू शकते. तसेच चेहर्‍याची चमक वाढते. यामुळे नाक, गाल, हनवुटीची त्वचा चमकदार होते. फेस योगाने वाढत्या वयाची लक्षणे दूर होतात.

फेस योगाचे फायदे

1 चेहर्‍याला चांगला आकार प्राप्त होतो.
2 सौंदर्य वाढते.
3 चेहर्‍यावर होणार्‍या समस्या दूर होतात.
4 हे उपाय मोफत आहेत.
5 सुरकुत्यांसारख्या वाढत्या वयाच्या खूणा दूर होतात.
6 चेहरा चमकदार होतो.
7 डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होतील
8 गालांवरील अतिरिक्त चरबीपासून सुटका होते.

नक्की वाचा







या आहेत पद्धती

1) जीभ पोझ

या मुद्रेत जीभ जेवढी लांब होईल तेवढी बाहेर काढा आणि पंचवीस ते तीस सेकंद तशीच ठेवा. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर होतील. याशिवाय डोळयाखालील सुरकुत्याही दूर होतात.

2) माशाच्या पोझ

यामध्ये बसल्यानंतर आपले ओठ आणि गाल आतील बाजूस ओढा. यामुळे चेहर्‍याचा आकार माशांसारखा होतो. काही सेकंद असे केल्यानंतर सोडून द्या. ही प्रक्रिया तीनवेळा करा. यामुळे मांसपेशी निरोगी होतात.

3) गुळणी करण्याची पोझ

ही सोपी प्रक्रिया आहे. ज्याप्रकारे तुम्ही तोंडात पाणी घेऊन गुळणी भरता, तसाच हा योग करू शकता. तोंडात हवा भरल्यानंतर गुळणी भरण्यासारखे तोंड हलवा. दोन ते तीनवेळा असे करा. यामुळे गालांवरील अतिरिक्त चरबीपासून सुटका होते.

4) हनुवटी वर उचलण्याची पोझ

या मुद्रेत मान वर करत आकाशाकडे पहावे लागते. यानंतर ओठ असे करा जसे की आकाशाचे चुंबन घेत आहात. काही सेकंदानंतर थांबा आणि पुन्हा असे दोन ते तीन वेळा करा. यामुळे मानेच्या मांसपेशी सुधारतात.

5) ध्यान मुद्रा

हे तुम्हाला कदाचित माहिती असेल. ध्यान मुद्रेत डोळे बंद केल्यानंतर आयब्रोजमध्ये ध्यान लावण्याचा प्रयत्न करा. सुमारे एक ते दोन मिनिट असे करा. यानंतर हळुहळु डोळे उघडा. असे दोन ते तीन वेळा करा.

6) टायगर पोझ

सर्वात शानदार पोझपैकी एक ही पोझ आहे. जबडा खालच्या बाजूला करत जीभ बाहेर काढा आणि खाली घेऊन जा. यानंतर हवा तोंडात खेचून वाघासारख आवाज काढा. ही प्रक्रिया पाचवेळा करा. यामुळे चेहर्‍याच्या मांसपेशी मजबूत होतात.