Weight loss will be followed by fatigue and constant tiredness

एक्सरसाइज (excercise) करण्याच्या वेळेच्या बाबतीत लोक नेहमीच संभ्रमात असतात. प्रत्येकाची आपल्या पसंतीची एक वेळ असते. काही लोक सकाळी लवकर उठतात. काही लोक उठतात, मात्र त्यांना जास्त अ‍ॅक्टिव्ह वाटत नसल्याने एक्सरसाइज करण्याची इच्छा होत नाही. अनेक लोक सायंकाळी एक्सरसाइज करतात किंवा वॉक करतात. तर काही लोक सकाळी उठून एक्सरसाइज करून दिवसाची सुरूवात करतात.

खुप कमी लोकांना माहित आहे की, एक्सरसाइजच्या वेळेचा वजनावर परिणाम होत असतो. जाणून घेवूयात सकाळ की संध्याकाळी व्यायाम केल्याने वजन घटते…

सकाळच्यावेळी एक्सरसाइज

सकाळी एक्सरसाइज करण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी लवकर उठल्याने दिवसभरासाठी खुप वेळ मिळतो. सकाळी सकाळी एक्सरसाइज केल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन तयार होते, ज्यामुळे तणाव कमी होऊन डोकं शांत रहाते. यामुळे दिवस चांगला जातो.

मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट अँउ एक्सरसाइजमध्ये प्रसिद्ध एका अभ्यासानुसार, ज्या महिला सकाळी उठून 45 मिनिटांपर्यंत ब्रिस्क वॉक करतात, त्यांचे लक्ष खाण्या-पिण्याकडे कमी जाते. एवढेच नाही, तर महिला पूर्ण दिवस अ‍ॅक्टिव्ह राहतात.सकाळी एक्सरसाइज केल्याने मेटाबॉलिज्म सुद्धा ठिक राहते, यामुळे पूर्ण दिवस कॅलरी कमी होत राहाते. सायंकाळी एक्सरसाइज करणार्‍यांच्या तुलनेत सकाळी एक्सरसाइज करणार्‍यांना झोप चांगली लागते.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

सायंकाळी एक्सरसाइज

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत, शरीराचे तापमान सर्वात जास्त असते. शरीराचे वाढते तापमान मांसपेशींना ताकद देते. याचा अर्थ हाच आहे की, यावेळी तुमचे शरीर एक्सरसाइज करण्यासाठी सर्वात जास्त तयार असते आणि याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.

दुपारी आणि सायंकाळी हृदयाची गती आणि ब्लड प्रेशर आपल्या सर्वात कमी स्तरावर असते. यामुळे आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता खुप कमी असते आणि एक्सरसाइजचा फायदा मिळतो. झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करू नये, कारण यामुळे झोपेची समस्या होऊ शकते.

मात्र, वेळेपेक्षा जास्त आवश्यक आहे की, तुम्ही एक रूटीन तयार करून नियमित एक्सरसाइज करणे गरजेचे आहे. यामुळे फिटनेस कायम राहतो, तणाव कमी होतो आणि शरीराल अनेक फायदे होतात.