After a dry cough

कोरड्या खोकल्यामध्ये (cough) घसा कोरडा पडून सतत खोकला येत राहतो. सतत येणाऱ्या या खोकल्यामुळे  पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. या वेदनांपासून व खोकल्यापासून सुटका करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत –

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या
उपाय –

१) मध
नियमित सकाळी रोज एक चमचा मध सेवन करा. किंवा कोमट पाण्यामध्ये मध टाकून नियमितपणे प्या.

२) हळद, सुंठ आणि गूळ
हळद, सुंठ आणि गूळ मिक्स करून त्याच्या लहान आकाराच्या गोळ्या बनवून ठेवा आणि साधारण एक किंवा दोन तासाने ही गोळी खा.

३) ज्येष्ठमधाचा चहा
कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. हा चहा दिवसातून जास्तीतजास्त दोन वेळा घ्यावा.

४) खडीसाखर
खडीसाखर चघळत राहिल्यानेदेखील कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते.

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.