How to measure your body's need for water

एखाद्या 45 किलो व्यक्तीला दररोज 85 किलो व्यक्तीला आवश्यक (Required) असेल इतकं पाणी पिण्याची गरज आहे का? वजनानुसार पाण्याची गरज मोजताना दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यावं लागतं आणि हे निरोगी राहण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. पाणी पिणं शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. पुरेसं पाणी न प्यायल्याने बर्‍याच आजारांना निमंत्रण दिलं जाऊ शकतं. दिवसभरात एखाद्या माणसाने किती पाणी प्यावं याचा लोकांना नेहमीच पेच पडतो.

साधारणपणे असं म्हणतात की दररोज 2 लिटर पाणी प्यावे. दररोज योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे चयापचय वाढतं आणि भूक देखील नियंत्रित होते. चा डॉ. मेधावी अग्रवाल म्हणतात की, शरीराच्या वजनानुसार पाण्याचं सेवन करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी प्रथम वजन मोजणं आवश्यक आहे. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे.

एकदा शरीराचं वजन (किलोग्रॅममध्ये) तपासलं गेल्यानंतर त्या संख्येला 30 ने भागायचं. येणारी संख्या ही रोज किती लीटर पाणी प्यायला हवं याची गणना आहे. म्हणजेच, या सूत्रानुसार, आपल्याला समजेल की शरीराच्या वजनानुसार आपण दररोज किती लिटर पाणी प्यावं. समजा वजन 60 किलो असेल तर ते 30 ने भागाकार  केल्यास 2 ही संख्या मिळेल. म्हणजेच, 60 किलो वजनाच्या व्यक्तीने दररोज 2 लिटर पाणी प्यावं. जर वजन 50 किलो असेल तर 1.6 लिटर (1 लिटर आणि 600 मिली) पाणी प्या.


नक्की वाचा



चे डॉ. आयुष पांडे म्हणतात की पुरेसं पाणी पिण्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. पुरेसं पाणी प्यायल्याने वजन वाढत नाही. पाण्यात कर्बोदकांचं प्रमाण बिलकुल नसते. याचा अर्थ असा की आपण पुरेसे पाणी प्याल्यास आपण मोठ्या प्रमाणात कार्ब्स खाणं टाळता आणि याने वजन वाढण्याचा धोका देखील कमी होतो.

दिवसभर वजनानुसार पुरेसे पाणी पिण्याची काळजी घ्या, जर तुम्ही व्यायाम करत असाल तर दर अर्ध्या तासाला किमान एक ग्लास पाणी प्या. याचे कारण असे आहे की व्यायामामुळे शरीरातील घाम निघून पाण्याची घट होते. त्याच वेळी, जेवण करण्यापूर्वी अर्धा लिटर पाणी प्या. त्याचा फायदा म्हणजे भूक कमी होईल.याची काळजी घ्या की तुम्ही तहान नसतानाही पाणी पीत रहाल. दिवसभर थोडे-थोडे पाणी प्या. जर नुसते पाणी पिणे आपल्याला जमत नसेल तर नसल्यास चविसाठी पुदिना, लिंबू किंवा आंबट फळे घालू शकता.

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.