Cold Water Skin Benefits

चेहर्‍याची चमक कायम राखण्याचा एक यशस्वी (Success) आणि प्रभावी मार्ग म्हणजे सकाळी बेडवरून उठून चेहरा थंड पाण्याने धुवावा. आपण बर्‍याच वेळा नोटीस केले असेल की जेव्हा आपण बेडवरून उठतो तेव्हा आपला चेहरा काहीसा फुगलेला दिसतो. चेहरा फुगलेला दिसण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या पेशी रिजनरेट होतात. म्हणूनच त्वचेवरील छिद्र अधिक खुलतात आणि चेहरा फुगलेला दिसतो. याशिवाय, चेहरा फुगलेला दिसण्याचे आणखीही अनेक कारणे असू शकतात, जसे की झोपेची कमतरता, ताणतणाव आणि कधीकधी फूड अ‍ॅलर्जीमुळे चेहऱ्याला सूज देखील येऊ शकते.

जर तुम्ही सकाळी थंड पाण्याने चेहरा धुतला तर चेहर्‍यावरील सूज कमी होईल, त्याचबरोबर रात्रीच्या वेळी त्वचेवर आलेल्या तेलापासून देखील सुटका मिळेल. थंड पाण्याने चेहरा धुवून तुम्हाला सकाळी ताजेतवाने वाटेल. थंड पाण्याने चेहरा धुण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया.

थंड पाणी बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर करेल

आइस्क्यूबने चेहरा चोळण्यामुळे त्वचेला जितका फायदा होतो तितकाच फायदा थंड पाण्याने होतो. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा तरुण आणि ताजी दिसते. थंड पाणी चेहऱ्यावरील असलेल्या सुरकुत्या आणि रेषा मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. म्हणून दररोज सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा.

थंड पाण्याने डल स्किनपासून सुटका

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेचा डलनेस कमी होतो. थंड पाणी तुमच्या त्वचेस ताजेतवाने ठेवते आणि तुम्हाला एनर्जेटिक असल्याचा अनुभव देते. थंड पाणी आपल्या त्वचेवर अधिक रक्त पंप करते ज्यामुळे त्वचा स्वच्छ दिसते.

थंड पाण्यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात

थंड पाण्याने चेहरा धुतल्यास आपल्या चेहर्‍यावरील छिद्र बंद होतात. जर आपण आपला चेहरा कोमट पाण्याने धुतला असेल तर चेहऱ्यावरील त्वचेचे छिद्र बंद करण्यासाठी चेहऱ्यावर थंड पाणी टाकावे. थंड पाण्याने आपले डोळे देखील उजळतात.

थंड पाणी सूर्याच्या हानिकारक प्रभावापासून वाचवते

सूर्य किरणांच्या हानिकारक प्रभावापासून मुक्त होण्यासाठी थंड पाणी हा एक चांगला मार्ग आहे. थंड पाण्यामुळे चेहर्‍यावरील हानिकारक सूर्यकिरणांचा प्रभाव कमी होतो. थंड पाण्यामुळे त्वचेचे उघडलेले छिद्र बंद होतात.