For these reasons, nails get blackened

अनेकांची
हाताची किंवा पायाची नखे (Nails) काळवंडलेली दिसतात. कधी कधी नखे काळवंडण्यामागे कारण असते. पण कधी कधी काही कारण नसताना अनेकांची नखे काळवंडतात ही नखे काळवंडण्यामागे नेमके काय कारण असू शकते हे अनेकदा आपल्याला कळत नाही. त्यामुळे तुमची नखे का काळवंडतात त्याची कारणे जाणून घ्या.

१) नखांना होणार्‍या इंफेक्शनमुळे त्यांचा रंग बदलण्याचा धोकाही वाढतो. नखांचा रंग निळा, पिवळा, हिरवा किंवा काळसर वाटत असेल त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. फंगल इंफेक्शनच्या तीव्रतेवरून पुढील उपचार ठरवले जातात. सौम्य स्वरूप असल्यास केवळ टॉपिकल औषधांनी त्यांना पूर्ववत केले जाते.

२) लांब धावण्यासाठी पायाला फिट्ट बसणाऱ्या चप्पलचा वापर केल्यास त्याचा त्रास पायांना आणि नखांजवळील भागाला होतो. त्यामुळे खूप घट्ट शूज वापरू नका. सौम्य प्रकारच्या दुखण्यांमध्ये नख वाढतात आणि काळसर भाग काढून टाकता येतो. मात्र त्रास खूपच जास्त असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय उपचारांच्या मदतीने डेड नेल संपूर्णपणे काढून टाकता येते. काळवंडलेल्या नखाजवळील त्वचादेखील लालसर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

३) आपण काळवंडलेल्या नखांकडे एवढ्या गांभीर्याने विचार करत नाही. पण असे करणे हे खूप मोठ्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. कारण या काळवंडलेल्या नखात एक गंभीर प्रकारचा स्कीन कॅन्सर हा नखांखालीच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. या कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होते. नखांच्या पलिकडे क्युटिकल्समध्येही त्वचेचा रंग बदललेला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

४) एखाद्या अपघातामध्ये किंवा अनावधानाने एखादी जड वस्तू पायावर पडल्यास नखांखालील नसांचे नुकसान होते. नसा फाटल्यास रक्त साकळते. परिणामी नखांचा रंग बदलतो. यामध्ये वेदना जाणवतात. नखाजवळील अशा प्रकारचा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.