Uses a razor to shave

अनेक जण दाढी (
Beard) करण्यासाठी रेझरचा वापर करतात. पण, या रेझरसंबंधी योग्य काळजी घेतली नाही तर अनेक गंभीर आजार तुम्हाला होऊ शकतात. रेझरची स्वच्छता नियमित ठेवली पाहिजे. तसेच रेझर इतर कुणी वापरत नाही ना, हे पाहिले पाहिजे. इतर कुणी ते वापरले तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. रेझरमुळे कोणते गंभीर आजार होतात ते जाणून घेवूयात.

होऊ शकतात हे आजार

1) अस्वच्छ रेझरचा वापरल्यास फंगल इन्फेक्शन किंवा यीस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

2) अन्य व्यक्तीने वापरलेले रेझर वापरल्यास त्वचेला खाज येते आणि जखमाही होऊ शकतात.

3) एमएसआरए हे एक गंभीर संक्रमण असून यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. याचं मुख्य कारण एकापेक्षा अधिक लोकांमध्ये रेझर शेअर करणे हे आहे. या रोगामध्ये त्वचेला सूज येते आणि त्वचेचा तो भाग लाल होतो. या संक्रमणामध्ये ताप येण्यासोबतच ज्या ठिकाणी इन्फेक्शन झाले आहे त्या जागेवर जखमा होऊन जखमांना पाणी सुटते. जखमा चिघळतात.

4) जर एका रेझरने एकापेक्षा अधिक लोकं शेविंग करत असतील तर, त्यांना हेपेटायटिस रोगाचा सामना करावा लागतो.





अशी घ्या काळजी

1) शक्यतो वन टाइम यूज रेझरचा वापरा.

2) दाढी करून झाल्यानंतर रेझर व्यवस्थित स्वच्छ करा.

3) अन्य व्यक्तीने वापरलेले रेझर वापरणे टाळा.

4) अन्य व्यक्तीने वापरलेले रेझर वापरण्याशिवाय पर्याय नसेल तर ते गरम पाण्यात टाकून स्वच्छ करून घ्या.