Increased risk of diabetes

चुकीच्‍या सवयींमुळे रक्तातील साखरेची (diabetes) पातळी वाढते. या सवयी सुरूच राहिल्या तर भविष्यात डायबिटीज होतो. यामुळेच अलिकडे डायबिजचे प्रमाण खुपच वाढले आहे. हा अतिशय धोकादायक आजार असून यामुळे शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. एखाद्या वेळी जीवावरही बेतू शकते.

असा करा बचाव
फिजिकली अ‍ॅक्‍टीव्‍ह राहीले पाहिजे. रोज ३० मिनिटांच्‍या व्‍यायामानेही कॅलरीज बर्न होतात. यामुळे फॅट कमी होते व डायबिटीजचा धोका कमी होतो. आहारात जास्‍तीत जास्‍त फळे, हिरव्‍या पालेभाज्‍या यांचा समावेश करावा.

यामुळे होतो डायबिटीज

 अधिक वेळ बसून राहणे
 योग्य आहार न घेणे
 पुरेशी झोप न घेणे
 जास्त स्नॅक्स खाणे
 जास्त गोड खाणे