Eat onion and garlic together, there will be 'these' benefits

कांदा (onion) व लसूण (garlic) यांचा दैनंदिन आहारात उपयोग केला जातो. परंतु या दोन्हींच्या एकत्रित खाण्याने अनेक फायदे होतात. याबाबत अनेकांना माहिती नसते. या दोन्ही कोणचे फायदे होतात हे जाणून घेवूयात.

लसणाचे अनेक गुणकारी लाभ आहेत. आरोग्यासाठी लसूण अत्यंत आवश्यक घटक समजला जातो. लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही, तर याच्‍या सेवनाचे अनेक फायदे आहेत. लसणाचे अनेक औषधी उपयोग आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्‍याच्‍या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्‍वरुपात वापरण्‍यात येत आहे. जवळपास ५ हजार वर्षांपूर्वी लसूण औषधी म्‍हणून भारतात वापरण्‍यात येत होता.

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. हे एक अँडीइंफ्लेमेटड्ढी असते. अंटीअ‍ॅलर्जिक, अंटीऑक्सीडेंट आणि अँटीकार्सिनोचेनिक असल्यामुळे कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी६, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात.

कोणत्या आजारांमध्ये लाभदायी
सांधेदुखीतून आराम मिळतो
अस्थमापासून बचाव होतो
वजन कमी होते
लिव्हरच्या समस्या कमी होतात
केस गळण्याचे थांबते
कॅन्सरपासून बचाव करतात
त्वचा विकार होत नाहीत