Don't ignore the 10 symptoms, get tested for HIV immediately

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एचआयव्ही/एड्स (HIV) जगातील सर्वात मोठ्या आरोग्य समस्यांपैकी एक आहे. या धोकादायक आजाराने आतापर्यंत सुमारे 35 मिलियन लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 37 मिलियन लोकांना याची लागण झाली आहे.

हा व्हायरस इम्युनिटी सिस्टम एवढी कमजोर करतो की, व्यक्ती कोणत्याही आजाराचा सामना करू शकत नाही, हळूहळू विविध आजार या व्यक्तीला मजडू लागतात. हिला आणि मुलांमध्ये याची लक्षणे वेगळी असू शकतातहा आजार असुरक्षित शारीरीक संबंध, दूषित रक्त किंवा वापरलेल्या इंजेक्शनच्या सुईमुळे पसरतो. हा आजार रोखण्यासाठी सुरक्षित शारीरीक संबंधाचे प्रयत्न काही मर्यादेपर्यंत यशस्वी ठरू शकतात. एचआयव्हीच्या सुरूवातीच्या टप्प्यात याची जाणीव होत नाही.

या आजाराची लक्षणे ओळखून वेळीच टेस्ट केल्यास उपचार करण्यास खुप मोठी मदत होऊ शकते. यासाठी जर खाली दिलेली लक्षणे सातत्याने आढळून आल्यास ताबडतोब एचआयव्ही टेस्ट केली पाहिजे.

ही आहेत लक्षणे

1) मोठ्या कालावधीपासून ताप
ताप ही सर्वसामान्य समस्या आहे. एक किंवा दोन दिवसात ताप उतरतो. परंतु, हा आजार मोठ्या कालावधीसाठी तसाच राहिल्यास एचआयव्हीची लागण झालेली असू शकते. एचआयव्हीचे हे सर्वात मोठे लक्षण आहे.

2) सतत थकवा जाणवणे
एचआयव्हीचे विषाणु शरीराच्या कार्यक्षमतेवर खुप वाईट परिणाम करतात. यामुळे सतत थकवा जाणवतो. एखादे काम करण्यापूर्वीच थकवा जाणवतो. असे असेल तर सावध व्हा.

3) मांसपेशी आखडणे
एचआयव्ही पीडित व्यक्तीच्या मांसपेशी नेहमी जखडल्यासारख्या वाटतात. त्यांना नेहमी अस्वस्थता जाणवते. ही समस्या सतत जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

4) डोकेदुखी आणि घशात खवखव
एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अतिशय वाईट परिणाम होतो. या कारणामुळे पीडित व्यक्तीला नेहमी डोकेदुखी आणि घशात खवखव होण्याची समस्या सतावते.

5) त्वचेला खाज आणि डाग
त्वचा आरोग्याबाबत खुप काही सांगत असते. एचआयव्हीचा संसर्ग झाल्यास त्वचासुद्धा याचे संकेत देते. त्वचेला खाज तसेच डाग पडणे ही याची लक्षणे आहेत.

6) वजन कमी होणे
एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या व्यक्तीचे वजन खुप मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागते. चांगला आहार घेऊन सुद्धा तुमच्या वजनात मोठी घट होत असेल तर सावध व्हा.

7) कोरडा खोकला आणि रात्री घाम येणे
नेहमी कोरडा खोकला हे एचआयव्हीचे लक्षण आहे. यामुळे पीडित व्यक्ती रात्री नीट झोपू शकत नाही. दम लागणे, अस्वस्थ वाटणे, बेचैनी, रात्री घाम येणे अशा समस्या जाणवतात.

8) पिवळी नखे आणि एकाग्रतेचा अभाव
एचआयव्हीची लागण झाल्यास नखे संकेत देतात. नखे पिवळी पडू लागतात. तसेच एकाग्रतेचा अभाव हे आजारी शरीराचे एक लक्षण आहे. व्यक्ती आपल्या कामात पूर्ण लक्ष देऊ शकत नाही.