Proper evaporation method and benefits

चेहऱ्यावर पाण्याची
वाफ (
Steam) घेण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी गरम करावं. गरम पाणी झाल्यावर भांडे गॅसवरून खाली काढून घ्या. गॅसवर वाफ घेण्याची चूक करु नका. वाफ घेण्यापूर्वी आ‍पले केस बांधून घ्यावे. नंतर आपल्या डोक्यावर टॉवेल झाकून आपला चेहरा त्या भांड्यापासून थोड्या लांबीवर  ठेवा.  सर्व बाजूने टॉवेल झाकून घ्या आणि आता आपल्या चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या


फायदे –
चेहर्‍यावर वाफ घेतल्याने त्वचेत आढळणारे टॉक्सिन कमी होतात.

पाण्याच्या वाफेमुळे आपल्या त्वचेमधील रक्त प्रवाह सुधारतो.

चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होतात.

चेहर्‍यावरील मृत त्वचा निघून जाते.

त्वचेमधील ओलावादेखील कायम राहतो.

त्वचेवरील थकवा, सुस्ती दूर होण्यास मदत मिळते.

त्वचा अधिक तरुण दिसू लागते.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसू लागते.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.