The simplest way to reduce the wight

लठ्ठपणा हा एक रोग असून कमी वयात वजन वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी योग करणे हा चांगला उपाय आहे. काही योगासने केल्याने लठ्ठपणा लवकर कमी होतो. यापैकीच एक अतिशय लाभदायक आसन म्हणजे ‘धनुरासन’ होय. हे आसन कसे करावे आणि त्याचे लाभ कोणते आहेत, याविषयी माहिती घेवूयात.

असे करा धनुरासन 

प्रथम पालथे झोपा. दोन्ही पाय एकमेकांशी जुळवून ठेवा. आता दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हात पाठीमागे नेउन दोन्ही पायांचे घोटे पकडावेत. हाताने पकडलेल्या पायांना खेचून हळूहळू वर उचलावे. शक्य होईल तितके डोके मागील बाजूस नेण्याचा प्रयत्न करावा. दृष्टी वर आणि मागील बाजूस असावी. संपूर्ण शरीराचा भार पोटावर येईल. कंबरेपासून वरील तसेच कंबरेखालील भाग वरच्या बाजूस वाकाविलेल्या स्थितीत राहील. त्यानंतर हात सोडून पाय आणि डोके मूळ स्थितीत आणावे. सुरुवातीस पाच सेकंद हे आसन करावे. नंतर सरावाने तीन मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्तवेळ करता येईल. तीन चार वेळा हे आसन करावे.

 धनुरासन करण्याचे  फायदे

* पोटाची चरबी कमी होते. गॅस दूर होतो. पोटाचे रोग नाहीसे होतात.

* मलावरोध दूर होतो. भूक वाढते.

* छातीचे दुखणे बंद होते. हृदयाची धडधड बंद होऊन हृदय मजबूत होते.

* गळ्याचे सर्व रोग दूर होऊन आवाज मधुर होतो.

* श्वसनक्रिया व्यवस्थित होते.

* डोळ्यांचे तेज वाढते व डोळ्यांच्या समस्या दूर होतात.