Take care when giving tiffins to children

लहान मुलांच्या शाळेच्या डब्यात (Lunchbox) नावडती भाजी असली की अनेकदा मूल जेवण करत नाहीत.आणि डब्यात जर आवडीची भाजी असेल तर डबा पूर्ण खाल्ला जातो. त्यामुळे मुलांचा शाळेचा डबा तयार करताना त्यांच्या आरोग्याचा आणि आरोग्यासाठी लागणाऱ्या पोषक घटकांचाही विचार करावा लागतो. मुलांच्या आरोग्यासाठी काय उपयुक्त आहे. काय नाही याचा विचार करून डबा बनवला तर मुलांचे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे मुलांचा डबा बनवताना काही गोष्टींची काळजी घ्या.

मुलांचा डबा बनवताना घ्या ही काळजी 

१) मुलांना डब्यामध्ये कधीच फळं किंवा भाज्या कापून देऊ नका. कारण त्यातून पोषक घटक मिळत नाही. आणि ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना डब्यात सलाड देणे टाळा.

२) मुलांना डब्यात सफरचंद, पेरू, केळी, चेरी, जामुन ही फळं देण चांगलं आहे. कारण ही फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. फक्त हि फळ मुलांना धुऊन द्या.

३) मुलांना डब्यात सँडविच सारखी फास्ट फूड देण्यापेक्षा पालेभाज्या द्या.

४) मुलांच्या डब्यात तव्यावर फ्राय केलेल्या भाज्या द्या. यातून मुलांना आवश्यक ते पोषण मिळत. मुलांना डब्यात तुम्ही देऊ शकता. याला जास्त वेळही लागत नसून भाज्यांच्या माध्यमातून मुलांना आवश्यक ते पोषण घटक मिळतात.

५) मुलांना डब्यात कडधान्यांचे पॅनकेक बनून द्या. ते बनवनही सोपं आहे आणि मुलांना ते आवडतही. आणि यातून शरीराला फायबरही मिळते.

६) मुलांना तळलेले स्नॅक्स देण्यापेक्षा भाजलेले पदार्थ खायला द्यावेत.

७) पालेभाज्या या शरीराला पोषक असतात. म्हणून आपण मुलांना कधी कोणत्याही पालेभाज्या देणं योग्य नाही. त्यामुळे ज्या हंगामात जी पालेभाजी असते. तीच पालेभाजी मुलांना डब्याला द्या.