Should I have sex during menstruation

मासिक पाळीच्या Menstruation
 काळात शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेक जण सांगतात की या कालावधीत संबंध ठेवू नये, शिवाय महिलांनादेखील अशावेळी संबंध ठेवताना कसंतरीच वाटतं. मात्र याबाबत तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, ते जाणून घेऊयात. तज्ज्ञांच्या मते, मासिक काळात शरीरसंबंध ठेवण्यात हरकत नाही. मात्र आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.
myupchar.com च्या डॉ. अर्चना निरुला म्हणाल्या, मासिक पाळी आली म्हणजे शरीर संबंध ठेऊ नये असं काही नाही. उलट महिलांना या काळात शरीर संबंध ठेवणं अधिक सुखद असतं. फक्त या काळात काही काळजी घ्यायला हवी.
ल्युब्रिकेशनची आवश्यकता नाही
मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. जर मासिक पाळीच्या काळात शरीर संबंध ठेवले तर ल्युब्रिकेशनची गरज नसते. तसेच या काळात संबंध ठेवला तर मासिक पाळीचे प्रभाव कमी होतात. अनेक महिलांना मासिक पाळीच्या काळात शरीर आखडणे, अर्धशिशी, डोकेदुखी अशा तक्रारी असतात. जर या काळात शारीरिक संबंध केला तर त्या तक्रारी कमी होतात.
संसर्गाचा धोका जास्त
मासिक पाळीच्या काळात सुरक्षित संबंध करणे खूप आवश्यक आहे. कारण या काळात संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. दोघांपैकी एकाने गर्भनिरोधक साधनाचा वापर केला पाहिजे. साधारणपणे योनीचा पीएच स्तर 3.8 ते 4.5 इतका असतो पण मासिक पाळीच्या काळात तो वाढतो, त्यामुळे यीस्ट अधिक वाढतात आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
गर्भधारणा होण्याचा धोका नाही
myupchar.com च्या डॉ. अर्चना निरुला यांनी सांगितलं, मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध केल्याने गर्भधारणा होण्याचा धोका नसतो. कारण या काळात महिलांमध्ये बीजफल होत नाही. उलट मासिक पाळी नंतर शरीर संबंध ठेवल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.
शारीरिक संबंधांमुळे वेदना कमी होतात
मासिक पाळीच्या काळात शरीर आखडणं, उदास वाटणं, पोट दुखणं, डोके दुखणं असा त्रास होतो. पण जर शरीरसंबंध ठेवले तर एंडोर्फिन, ऑक्सिटोसिन आणि डोपामाइनसारखे हार्मोन निर्माण होतात त्याने शरीराला सुख मिळतं.
लैंगिक उत्तेजना जास्त अनुभवता येते
मासिक पाळीच्या काळात जर शरीर संबंध ठेवले तर अधिक लैंगिक उत्तेजना अनुभवता येते. या काळात यौन अवयव जास्त संवेदनशीलता अनुभवतात. डॉक्टरांच्या मते अनेक महिला पेल्विक भागात रक्त संकुचनपण अनुभवतात.
जोडीदाराच्या इच्छेनेच करा शरीर संबंध
मासिक पाळीच्या काळात शरीर संबंध करायला खूप कमी लोकांना आवडते. याचे कारण म्हणजे अधिकतर महिलांना या काळात शरीर संबंध ठेवायला संकोच वाटतो. मासिक पाळीच्या काळात आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला आणि मगच शरीर संबंध ठेवा.
लैंगिक संबंध म्हणजे फक्त शारीरिक सुख नाहीएक व्यायाम आहे
साधारणपणे शरीर संबंध आनंद आणि शारीरिक सुख मिळवण्यासाठी केले जातात. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की शरीर संबंध केल्याने खूप जास्त प्रमाणात कॅलरी बर्न होतात. जर मासिक पाळीच्या काळात शरीर संबंध केले तर महिलांचा शारीरिक व्यायाम होतो आणि दूषित रक्तस्त्राव होतं . हे दूषित रक्त एक प्रकारे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकते. त्याने महिलांना अनेक त्रासांपासून सुटका मिळू शकते.