Turmeric Benefits

तुम्हाला आरोग्यासाठी हळदीच्या (Turmeric) फायद्यांविषयी माहिती असेलच. हे किचनमधील औषधांपैकी एक आहे, ज्याचा वापर शतकानुशतके आयुर्वेदातही केला जात आहे. आरोग्याबरोबरच हळद सुंदर त्वचा मिळवण्यासाठी देखील वापरली जाते. विशेषत: भारतात लग्नाच्या आधी नवरा आणि नवरीला हळद लावली जाते, जेणेकरून त्यांची त्वचा उजळेल. याशिवाय हळद त्वचेला अनेक फायदे पोचवते. हळदीच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.

१) त्वचेसंबंधी समस्या दूर करते
तुम्हाला माहिती आहे की, हळदीत असलेल्या करक्युमिन या नैसर्गिक घटकामुळे फायदा होतो. करक्युमिन रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये विशिष्ट उत्तेजनांना दाबून टाकते. सूज, सोरायसिस आणि एक्झिमा यासारख्या त्वचेच्या संसर्गात फायदेशीर ठरते.

२) जखमा लवकर बऱ्या होतात
हळदीमध्ये ऑक्सिडेशन आणि तणावाचा प्रतिसाद कमी करण्याचा एक चांगला गुणधर्म असतो. हे दोन्ही गुणधर्म आपल्या शरीरावर होणाऱ्या कोणत्याही जखमांना वेगाने बरे करण्यास मदत करू शकतात. फक्त जखमेवर थोडी हळद लावून हलक्या हाताने दाबा.

नक्की वाचा

1) Health Tips : रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे होतात ‘हे’ 9 जबरदस्त फायदे


३) सुरकुत्या कमी करते
हळद त्या मुक्त कणांना दाबून टाकण्यास सक्षम आहे, ज्यामुळे वृद्धत्व येते. तसेच ती त्वचेमध्ये कोलेजेन आणि आर्द्रतेची पातळी देखील राखते. याचा अर्थ हळद त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

४) सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या हानीला कमी करते
संशोधनात असे दिसून आले आहे की, हळदीमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म सूर्य किरणांमुळे होणारे नुकसान कमी करण्यातही प्रभावी आहेत. याच कारणास्तव उष्णतेमुळे होणाऱ्या रॅशेसवर हळदीची पेस्ट लावल्यास थंडपणा आणि आराम मिळतो.

५) डार्क स्पॉट्सशी लढते
हळद त्वचेला शुध्द करते. तसेच त्यातील विशेष गुणधर्म त्वचेवरील मुरुम आणि संसर्गाशी लढतात. नाजूक त्वचा असलेल्या लोकांसाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये असलेले करक्युमिन डार्क स्पॉट्स, हायपरपिगमेंटेशन आणि सूर्यप्रकाशाच्या क किरणांमुळे होणारे नुकसान बरे करते.