Before and after starting yoga

फिट राहण्यासाठी योगा (Yoga) हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे. परंतु, योगासने सुरु करण्यापूर्वी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. शारीरीक तसेच मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक आहे. यामुळे शरीर सदृढ होते. तणाव आणि मानसिक रोग दूर होतात.

हे आहेत फायदे

१. उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा रामबाण उपाय आहे.

२. योगामुळे जीवन आनंदी आणि सुखी होऊन रोग होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी होते.

योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी

* योगा सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला घ्या.

* शारीरिक तपासणी करा.

* डॉक्टरकडून सल्ला घ्या.

* काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजार ग्रस्तांसाठी योग्य नसतात.

नक्की वाचा


लक्षात ठेवा

१. एखादा गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग करा.
२. योगा सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घ्यावा.
३. सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये.
४. रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी रक्तदाब तपासा. शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळा.
५. योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.
६. कमजोर प्रकृती असणारांनी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने करा.