‘Bananas’ are beneficial for health

केळी हे फळ अनेकांच्या आवडीचं आहे. आणि विशेष म्हणजे सध्या जे रसायन खते वापरून फळ पिकवली जातात. त्या फळांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण केळीचे कवच जाड असल्यामुळे त्याचा केळीवर काही परिणाम होत नाही. आणि जाड कवच असल्यामुळे त्यात किडे, जंतू जात नाहीत. म्हणून याचा आपल्या आरोग्यावरही काही वापरीत परिणाम होत नाही.

केळीचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे

१) रक्ताची कमतरता असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे फायदेशीर ठरते. केळामुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

२) केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोह भरपूर प्रमाणात असल्याने हाडांचा ठिसूळपणा हा आजार टाळण्यासाठी रोज एक केळी खावी.

३) पिकलेल्या केळीचे साल काढून ती स्वच्छ धुऊन त्याची भाजी बनवून खाल्लेले चांगले असते. कारण केळ्याच्या सालीमध्ये फायबर व जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

४) शौचास त्रास असेल तर केळे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते. कारण केळे खाल्ल्याने स्नायूंची हालचाल, आकुंचन-प्रसरण व्यवस्थित होऊन आतडय़ामध्ये साचलेला मळ पुढे ढकलण्यास मदत होते.

५) कृश व्यक्तींना वजन वाढवायचे असेल तर रोज दुपारी चार केळी खावीत. यामध्ये भरपूर उष्मांक असल्याने महिन्याभरात वजन वाढते.

६) सूर्याच्या प्रखर उष्णतेने किंवा आगीच्या चटक्यांनी होणारी शरीराची आग थांबविण्यासाठी त्वचेवर केळ्याचा गर लावावा, यामुळे शरीराचा दाह कमी होतो.

७) केळफुलामुळे गर्भाशयाच्या तक्रारी दूर करता येतात. कारण केळफुलाच्या सेवनाने शरीरातील Harmones प्रमाण संतुलित करता येते. यामुळे मासिक पाळीत अति रक्तस्राव होत असेल तर केळफुलाची भाजी खाणे उपयुक्त ठरते.

८) केळीमध्ये पोटॅशिअम जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा अतिरक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत होते.