Drinking water

कमी प्रमाणात पाणी (Water) प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि नंतर विविध आजार त्रास देऊ लागतात. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. पुरेसे पाणी पित असलात तरी ते पिताना काही चूका होत असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम शरीरावर होतो. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी पाणी पिण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.

नक्की वाचा

1) ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का ?, जाणून घ्या

हे लक्षात ठेवा

1) पाणी नेहमी हळूहळू पाणी प्यायला हवं. पटपट घोट घेत पाणी प्यायल्यास शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
2) उभं राहून कधीही पाणी पिऊ नका. उभं राहून पाणी प्यायल्याने पोटाच्या खालच्या भागात पाणी जाते. त्यामुळे शरीराला पुरेश्या प्रमाणात पाणी मिळत नाही. शिवाय कालांतराने गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते.
3) बाटलीने पाणी पिणं टाळून ग्लासनं पाणी प्या.
4) आजारी असाल तर जास्तीत जास्त पाणी प्या.
5) सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या.
6) जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल.
7) जेवल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्या.
8) व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही.
9) आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी रोज योग्य प्रमाणात प्या.

हे आहेत फायदे

1) विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते.
2) ऊर्जेतही वाढ होत राहाते.
3) घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं.
4) किडनी स्टोनसारख्या समस्या होणार नाहीत.
5) रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने आजार दूर राहतात.
6) पचनशक्ती वाढते.