
बाजारात मिळणार्या ब्युटी प्रॉडक्टमुळे त्वचा स्वच्छ होते, पण त्यामधील केमिकलचा वाईट परिणामसुद्धा तुमच्या त्वचेवर होतो. ज्यामुळे त्वचेवर फोड, मुरूम, आणि रॅशेस (Rashes) येतात. या समस्या दूर करण्यासाठी आणि सौदर्य वाढवण्यासाठी मोसंबी एक चांगला पर्याय आहे. मोसंबी सौंदर्य वाढवण्यासाठी एक चमत्कारी फळ आहे. जाणून घेवूयात मोसंबीचे फायदे :
1) मोसंबीचा ज्यूस प्यायल्याने त्वचा चांगली होते. डोळ्याच्या जवळची काळी वर्तुळे आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते.
2) मोसंबीचा ज्यूस प्यायल्याने ब्लड सर्क्युलेशन खुप चांगले होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे अनेक गंभीर समस्यांपासून दिलासा मिळतो.
3) मुरमांच्या समस्येत चांगला लाभ होतो.
4) हाताचे कोपरे, गुडघे, मान आणि डोळ्यांच्या जवळ आलेला काळपटपणा मोसंबी ज्यूस प्यायल्याने दूर होतो. कारण यामध्ये अँटीऑक्सीडेंट, अँटीबायोटिक आणि किटाणूंपासून त्वचेचे रक्षण करणारी तत्व असतात.
5) उन्हाळ्यात चेहर्याची त्वचा खुप कोरडी आणि निस्तेज होते. ही समस्या दूर करण्यासाठी मोसंबीचे कापून दोन भाग आणि याचा रस चेहर्याला लावा. यामध्ये सॅट्रीक अॅसिड असते जे त्वचेसाठी ब्लीचिंग एजंटप्रमाणे काम करते आणि चेहर्याचा गोरेपणा आणि उजळतो.
0 Comments