5 things to look for when using the Facewash

चेहरा (Face) धुताना बहुतांश लोक फेस वॉशचा वापर करतात. पंरतु जर तुम्ही चुकीचं फेस वॉश निवडलं तर चेहऱ्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. आता तुम्ही खरेदी केलेलं फेसवॉश योग्य आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चेहऱ्यावर दिसणाऱ्या लक्षणांचा नीट अभ्यास करावा लागेल. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

1) त्वचा जास्त संवेदनशील होते – जर एखादा फेसवॉश वापरल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जळजळ होत असेल किंवा खाज सुटत असेल तर तुम्ही सौम्य स्वरूपाचा फेस वॉश वापरणं गरजेचं आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेत तुम्ही नैसर्गिक सामग्रीचा वापर केलेले फेस वॉश वापरू शकता.

2) त्वचा दिसू लागते निर्जीव – फेसवॉश त्वचा एक्सफोलिएट करण्याचं काम करतं. जर फेसवॉशनं चेहरा धुतल्यानंतर तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक दिसत नसेल तर समजून घ्या की, तुम्ही चुकीचं फेसवॉश निवडलं आहे. फेसवॉशनं चेहरा धुतल्यानंतर जर त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू लागली तर संबंधित प्रॉडक्ट आपल्या त्वचेसाठी योग्य प्रकारे काम करत आहे असा काहींचा समज असतो. परंतु हा समज चुकीचा आहे. उलट फेसवॉश मधील घटक हे हायड्रेटींग असणं आवश्यक आहे.

3) कमी वयात वृद्धत्वाची लक्षणं दिसणं – जर असं होत असेल तर फेसवॉशसह इतरही ब्युटी प्रॉडक्ट तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे. कधी कधी याचा परिणाम हळूहळू आणि उशीरा दिसतो.

4) T-Zone ची त्वचा ताणली जाणे – चुकीच्या फेसवॉशमुळंही त्वचेवरील ओलावा कमी होतो. ज्यांची त्वचा आधीच कोरडी आहे त्यांच्या ओठ आणि नाकाजवळ काळे डाग दिसण्यास सुरुवात होते. चुकीचा फेसवॉश निवडला तर त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि पीएच लेवल प्रभावित होते.

5) मुरुमांची समस्या – अनेकांना ही ससम्या असते. कितीही उपाय केला तरी काहींना यासाठी फरक जाणवत नाही. अनेकजण सतत आपलं फेसवॉश बदलत राहतात. अनेक फेसवॉश असे आहेत जे मुरुम कमी करण्याचा दावा करत विकले जातात. काहींचा समज असतो की, यामुळं त्वचेचे पोर्स खुले होतील. परंतु अनेकदा हे प्रॉडक्ट आपल्या चेहऱ्यासाठी हानिकारक ठरतात. यातील केमिकलमुळं त्वचेतील ओलावा आणि तेज कमी होतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.