Here are 10 benefits of eating bananas

केळी (Bananas) असे  एक फळ आहे जे  कोणत्याही ऋतूत मिळतो. अशा या गुणकारी केळीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. दिवसभर काही न खाता केवळ केळी जरी खाल्ली  तर आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.

केळी खाण्याचे  फायदे

– केळी खाल्याने आपल्याला लगेच एनर्जी मिळते. सकाळी नाष्ट्यात  केळी  खाल्ल्याने दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. केळी खाल्याने पचनक्रियाही सुधारते. गॅसची समस्याही दूर करण्यास केळी उपयुक्त ठरते.

– जर तुम्ही सतत प्रवास करत असाल तर अशा वेळी फक्त केळी जरी खाल्यास शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. प्रवासादरम्यान केळी खाल्याने कफचा त्रासही दूर होतो.

– केळीत असणाऱ्या ट्रायफोटोपणमूळे मेंदू  शांत राहतो.  यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांसाठी केळी खूप फायदेमंद आहे.

– दररोज केळी  खाल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.

– दुधामध्ये केळी आणि मध मिसळून खाल्याने चांगली झोप येते. झोप न येण्याची समस्याही दूर होते.

– दारू पिल्याने चढलेली नशा उतरवण्यासाठी केळी मिल्कशेक लाभदायक असतो.

– दररोज २ केळी आणि मध खाल्याने हृदयाचे आजार कमी होतात.

– नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास केळी, साखर आणि दूध यांचे सेवन केल्याने ही समस्या दूर होते.

– गर्भवती महिलांनी केळी जरूर  खाल्ली  पाहिजे.

– केळीत असणाऱ्या व्हिटॅमिन सी, बी ६ आणि फायबरमूळे वृद्धांना होणारे आजार कमी करण्यासाठी केळी उपयुक्त मानले जाते.

– केळी खाल्याने मांसपेशी  मजबूत करण्यासाठी फायदेमंद होतात.

– केळीच्या सालीची  पेस्ट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी कमी होते.